Best 250+ Marathi Ukhane for Male | नवरदेवासाठी मराठी उखाणे संग्रह

Marathi Ukhane for Male

Marathi Ukhane for Male: मराठी परंपरेतले उखाणे हे केवळ एक प्रथा नाहीत तर एक गोड संस्कृतीचा ठेवा आहेत. लग्नसमारंभ असो वा एखाद्या खास सणाची रात्र, नवरदेवाचा उखाणा घेताना एक वेगळीच गंमत असते. उखाण्यांमधून प्रेम, जिव्हाळा, कुटुंबाविषयीची आपुलकी आणि थोडेसे खट्याळपणाही उमटतो. येथे आम्ही तुमच्यासाठी २५०+ पेक्षा जास्त उत्कृष्ट मराठी उखाण्यांचा संग्रह देत आहोत, जे प्रत्येक प्रसंगी योग्य ठरतील.

Marathi Ukhane for Male

Marathi Ukhane for Male
Marathi Ukhane for Male

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
___ चे नाव घेतो आपल्या घरात!

जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर … सारथी.

प्रसन्न वदनाने आले रविराज,
… ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.

बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,
… चे नाव घेतो लग्नाच्या राती.

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
__ ला भरवितो जिलेबीचा घास!

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत,
_ नसलीस की Online मला नाही करमत!

चांदीच्या सायकलीला सोन्याच्या तारा,
मी बसलो सायकलीवर __ ला घालतो वारा!

मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं,
माझं मन रोज नव्याने, _ च्याच प्रेमात पडत.

सोन्याची सायकल, चांदीच शीट
चल गं _ डबलशीट..!

जगाला सुवास देत उमलली कळी,
भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी.

Marathi Ukhane for Male Funny

Marathi Ukhane for Male Funny
Marathi Ukhane for Male Funny

उन्हाळ्यात अंगाला घाम येतो फार
अंघोळ कर ……, नाहीतर लोकं होतील पसार.

कोरा कागद काळी शाई,
……… ला देवळात जायची रोजच घाई.

ब्रह्मदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
तू माझी देवसेना आणि मी तुझा बाहुबली.

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा,
……… माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

Hangover उतरायला उपयोगी पडते लिंबू,
…… एवढी हॉट असताना, ऑफिसमध्ये कशाला थांबू.

गोव्यावरून आणले खास फेणी आणि काजू,
…… चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

एक बाटली दोन ग्लास,
……. आहे माझी फर्स्ट क्लास.

पुढे जाते वासरू, मागून चालली गाय,
…….. ला आवडते नेहमी दुधावरची साय.

नव्या कोऱ्या रुळांवर ट्रेन धावते एकदम फास्ट,
चल ……… पिक्चरला सीट पकडू लास्ट.

सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच,
……….. चं नाव घेताच मनी उठतात रोमांच.

You might also love to read: Love Quotes in Marathi

Comedy Marathi Ukhane for Male Funny

Comedy Marathi Ukhane for Male Funny
Comedy Marathi Ukhane for Male Funny

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर
…. आहे, माझ्या लाइफ चा सर्वर

लग्न जमल्यापासून रात्रीचा लागत नाही डोळा,
… चे नाव ऐकण्यासाठी कावळ्यासारखे झाले सगळे गोळा.

लिपस्टीक वाढवते _ ची ब्युटी,
टेस्ट घेणे ही माझी आवडती ड्युटी.

झाले लग्न, आयुष्य झाले सेट,
बायकोच्या शब्दाला आता आहे माझं “Yes Madam, Perfect!”

एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात,
आणि … बरोबर लग्न करून पडलं म्हशीचं लोढनं गळ्यात.

खडी साखरेची गोडी, आणि फुलांचा सुगंध,
……..रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

पुरणपोळीत तुप असावे, साजुक ……….. आहेत आमच्या फार नाजुक.

सोन्याच्या कपावर चांदीची बशी,
………. समोर फिक्या पडतील रंभा अन उर्वशी.

दारी होते कोनाडे, त्यात होती पळी,
माझी ………. व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.

प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी,
………… तिचा मी राजा आणि माझी ती राणी.

Chavat Marathi Ukhane for Male Funny

Chavat Marathi Ukhane for Male Funny
Chavat Marathi Ukhane for Male Funny

सगळ्या गावात माझ्या …… वानी हुशार नाही कोणी,
आणि तुम्हाला काय सांगू, लई चाबरी आहे ती सोनी.

वादळ आलं, पाऊस आला, नंतर आला पूर,
… लई वळवळ करू नको, नाहीतर काढील कानाखाली धूर.

ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी,
सुखी ठेवा गजानना, _ आणि माझी ही जोड़ी.

दिवाळीत पणती हलती डुलती,
आणि …. झोपेतच रांगती.

आमच्या लग्नासाठी, नाही केला कोणी अपोज,
… ला मारतो आज, सगळ्यांसमोर प्रपोज.

महादेवाच्या पिंडीवर निवद ठेवला गोड,
आणि … ला डोळा मारायची लई घाण खो

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी, पेढे,
_ चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव,
__ रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
_ च्या जीवावर करते मी मजा.

रेशमाचा सदरा, त्याला प्लास्टिकचे बक्कल,
__ राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.

Marathi Ukhane for Male Romantic

Marathi Ukhane for Male Romantic
Marathi Ukhane for Male Romantic

मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं,
माझं मन रोज नव्याने, _ च्याच प्रेमात पडतं.

भल्यामोठ्या समुद्रात छोटीशी होडी,
_ ची आणि माझी लाखात एक जोडी.

कळी हसेल, फुल उमलले, मोहरून येईल सुगंध,
………. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा,
सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा!

कोरा कागद, काळी शाई,
… ला रोज देवळात जाण्याची घाई.

… बिल्डिंग, घराला लावली घंटी,
… माझी बबली आणि मी तिचा बंटी.

उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो _ च्या, गालावरचा तीळ.

नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
_ बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार.

Simple Ukhane in Marathi for Male

Simple Ukhane in Marathi for Male
Simple Ukhane in Marathi for Male

एक दिवा, दोन वाती,
___ माझी, जीवन साथी.

ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
_ समोर माझ्या, सोन पण लोखंड.

लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त,
…………….. आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त!

आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे,
…………… च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे…

आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर,
_ च्या आगमनाने पडली त्यात भर.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
_ चे बरोबर बांधली जीवन गाठ.

शंकरा सारखा पिता आणि पार्वती सारखी माता,
… राणी मिळाली, स्वर्ग आला होता.

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
_ चे नाव घेऊन सोडतो कंकण.

Baby Shower Dohale Jevan Ukhane Marathi for Male

Baby Shower Dohale Jevan Ukhane Marathi for Male
Baby Shower Dohale Jevan Ukhane Marathi for Male

बागेत होतं गुलाब, गुलाबाला होता काटा,
….. च नाव घेतो, डोहाळे जेवणाला गुलाबजाम खाता खाता.

डोहाळे जेवणाचा दिवस आहे आमच्याकरिता खास,
….. ला देतो कांदापोहेचा घास.

तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले,
..…. च नाव आहे गोड, पुरवा…… चे डोहाळे.

या बकुळीच्या झाडाखाली, आठवणींची लाख फुले,
_ रावांच्या घरी लवकरच एक, रेशमी झुला झुले

आजच्या कार्यक्रमासाठी, फुले भेटली स्वस्त,
__ रावांचे नाव घ्यायला, कारण लाभलं मस्त.

या सुंदर क्षणी मन भारावून गेले,
………. च नाव घेतो, डोहाळे जेवणाच्या दिवशी सतराशे साठ गिफ्ट्स आले.

आनंद झाला, वाटू पेढे आणि बर्फी,
……… च नाव घेतो, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

दिवाळीत दिली हिला पैठणी साडी,
……….. च नाव घेतो, डोहाळे जेवणाच्या दिवशी दिसती झक्कास आमची जोडी.

Modern Marathi Ukhane for Male

Modern Marathi Ukhane for Male
Modern Marathi Ukhane for Male

आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
_ चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.

अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
_ माझी सर्वांपेक्षा सुंदर.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्रि,
_ झाली आज माझी गृहमंत्री.

स्वरांचा सुर, सुरांची गायिकी, _ समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.

हत्तीच्या अंबारीला, मखमली झूल _ माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल.

घटका गेली, पळे गेली, राम का हो म्हणा………. चे नाव घेतो, थांबवा आता ठणाण.

छोटीशी तुळस, घराच्या दारी,
तुमची _, माझी जबाबदारी.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
_ चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल…

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ,
_ ने दिला मला प्रेमाची साथ…!

मातीच्या चुली घालतात घरोघरी,
….. झालीस तू माझी, आता चल माझ्या बरोबरी.

Vastu Shanti Ukhane in Marathi for Male

Vastu Shanti Ukhane in Marathi for Male
Vastu Shanti Ukhane in Marathi for Male

मंगल कार्याची सुरवात होते श्री गणेशाचा पूजे पासुन,
आणि ………. च नाव घेयला सुरवात केली आज पासून.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
….. च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

भाजीत भाजी मेथीची, …… माझ्या प्रीतीची.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
………. झाली आज माझी गृहमंत्री.

चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण,
… चे नाव घेऊन सोडतो आता कंकण.

सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव,
………. च्या मेहंदीत, माझे नाव

राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ,
….. शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.

रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,
… च्या साथीने आदर्श संसार करीन.

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,
… च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.

Gondhal Ukhane in Marathi for Male

Gondhal Ukhane in Marathi for Male
Gondhal Ukhane in Marathi for Male

_ च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट, ला पाहून, पडली माझी विकेट.

स्वरांचा सुर, सुरांची गायिकी, _ समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान _ च्या रूपाने, झालो मी बेभान.

माझ्या बायकोची साडी रंगीबेरंगी,
उन्हाळ्यात तरी तिची छाया गार.

माझ्या बायकोचे केस केसावर सुंदर,
तिच्या हास्याने मनाचे सारे दुख विसरले.

माझ्या बायकोची भुकेची वाट चविष्ट,
ती जेवते की सारे घर खुशीत.

माझ्या बायकोचा पावसासारखा प्रेम,
तो पडतो की सारे जीवन भरते गंध.

२५०+ मराठी उखाण्यांचा ठेवा

वरील निवडक उखाण्यांव्यतिरिक्त, आम्ही तुमच्यासाठी २५० हून अधिक मराठी उखाण्यांचा मोठा संग्रह दिला आहे. हे उखाणे तुम्ही लग्न, हळदीकुंकू, गृहप्रवेश, सण, कौटुंबिक समारंभ, किंवा खास क्षणात वापरू शकता. प्रत्येक उखाण्यात प्रेम, गोडवा, विनोद, संस्कार आणि संस्कृतीची झलक आहे.

Read More: Marathi Ukhane for Female

Final Words

मराठी उखाणे नवऱ्यांसाठी हे केवळ एक प्रथा नसून आपल्या नात्यांमधील प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. नवऱ्यांनी घेतलेले हे उखाणे केवळ परंपरा जपतात असे नाही, तर कुटुंबातील एकोपाही वाढवतात. लग्नसोहळा असो वा दैनंदिन संसार, योग्य वेळी घेतलेला गोड उखाणा हे नातं अधिक घट्ट करतो.

FAQs

मराठी उखाणे ही एक पारंपरिक प्रथा आहे ज्यामध्ये नवरा किंवा नवरी आपल्या जोडीदाराचे नाव एका कवितेसारख्या गोड ओळींमधून घेतात. यात विनोद, प्रेम, आदर आणि संस्कृतीची झलक दिसते.

नवरदेवाचे उखाणे प्रामुख्याने लग्नसोहळ्यात, हळदीकुंकू, गृहप्रवेश, दिवाळी, नवरात्र, सण-उत्सव आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये घेतले जातात.

नवरदेवाचे उखाणे साधे, गोड, आणि प्रसंगाला साजेसे असावेत. त्यात पत्नीबद्दलचा आदर, प्रेम आणि थोडीशी मजेशीर भावना व्यक्त झाली तर उखाणा अधिक प्रभावी ठरतो.

होय, विनोदी उखाणे वातावरण अधिक रंगतदार करतात. मात्र ते मर्यादेत आणि आदराने घेतले तरच योग्य वाटतात.

साधारण १०-१५ उखाणे पाठ केले तरी पुरेसे असतात. पण प्रसंगानुसार नवे आणि वेगळे उखाणे तयार ठेवले तर अधिक छान वाटते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *